Thursday, 2 March 2017

खंड





Image result for आशिया खंड
आशिया खंड
आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.
आशिया किंवा एशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातील सर्वांत मोठा व सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील ६०% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८.६% भाग आशियाने व्यापला आहे.
सिंधू संस्कृती, बॅबिलोनियन संस्कृती, सुमेरियन संस्कृती इ. प्राचीन संस्कृतींचा उगम या खंडातच झाला. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी इ. धर्मांचा उदय देखील याच खंडात झाला.
१ कोटी ७२ लाख १२ हजार वर्ग मैल क्षेत्रफळ असलेल्या या खंडात ४७ देश आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या ३८७९०००००० एवढी आहे.
आशिया

युरोप


युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगाकास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.
युरोप

आफ्रिका

आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या २०.४ टक्के जमीन या खंडात येते. इ. स. २००९ मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या १४.७२ टक्के एवढी होती.
आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र , ईशान्येला सुएझ कालवालाल समुद्र आणि सिनाई द्वीपकल्प आहेत. आग्नेयेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागरआहेतमादागास्करआणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण ५६ सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
आफ्रिकेत, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मानववंशाची सुरुवात झाली अशी वैज्ञानिक समुदायाची मान्यता आहे. ग्रेट एप्सच्या रुपात त्यांची सुरूवात सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाज त्या भागात सापडलेल्या सर्वात जुन्या मानवी अवशेषांवरून करण्यात आला आहे. मानवाचे (होमो सेपियन्स) अस्तित्व दोन लाख वर्षांपूर्वी इथिओपिया देशात असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला आफ्रिका हा खंड आहे. आफ्रिकेत विविध भौगोलिक प्रदेश दिसून येतात. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.
आफ्रिका


अमेरिका खंड

अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंडआहे. अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिका व कॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.
अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.
हा खंड म्हणजेच युरोपमध्ये नवे जग समजले जाणारा भूप्रदेश आहे हे अमेरिगो वेस्पुचीने सिद्ध केले. या खंडाचे नाव वेस्पुचीच्या नावावरुनच आले आहे.
दक्षिण अमेरिका
हा पृथ्वीवरील ५ प्रमुख खंडांपैकी एक खंड आहे. दक्षिण अमेरिका पश्चिम व दक्षिण गोलार्धात स्थित असून तो बर्‍याचदा अमेरिका ह्या मोठ्या खंडाचा एक उपखंड देखील मानला जातो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्व व उत्तरेला अटलांटिक महासागर व वायव्येला उत्तर अमेरिका खंड व कॅरिबियन समुद्रआहेत.
दक्षिण अमेरिका खंडाचे क्षेत्रफळ १,७८,४०,००० चौ. किमी (६८,९०,००० चौ. मैल) (चौथ्या क्रमांकावर) तर लोकसंख्या ३८,५७,४२,५५४ (पाचव्या क्रमांकावर) आहे.

उत्तर अमेरिका खंड 
उत्तर अमेरिका – अमेरिका खंडाचे मुख्य तीन स्वाभाविक विभाग आहेत; उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिका. उत्तर अमेरिकेची व जुन्या जगाच्या उत्तर खंडाची तुलना केली असतां यूरेशिया व उत्तर अमेरिका यांच्यांत बरेंच साम्य आढळतें. या साम्यावरून असें दिसतें कीं, या दोन्ही भागांपैकीं कोणताहि भाग भूस्तरशास्त्रदृष्ट्या एकापेक्षां जुना अथवा नवा नाहीं व दोहोंमध्यें अतिशय जुने असे भूस्तरविषयक फरक सारखेच झालेले आहेत.
उत्तर अमेरिका व यूरेशिया यांच्यांत हवापाण्यासंबंधींहि साम्य आहे. अमेरिकेंतील अपॅलेचेन व यूरोपांतील हर्सेनियन पर्वतात विपुल कोळसा आहे व तो भूस्तरशास्त्रदृष्ट्या सारखाच जुना ठरतो. यावरून अति प्राचीन काळीं सुद्धां हवापाण्याच्या मानानें व भूगोलाच्या दृष्टीनें या दोहोंत साम्य होतें असें दिसतें. हल्लींहि हवापाण्याच्या दृष्टीनें अमेरिका व यूरेशिया यांच्यांत साम्य आहे. तथापि एकंदरींत येथील हवा विषम आहे. या भागांतील हिंवाळा यूरोपातील हिंवाळ्यापेक्षां जास्त कडक असतो. पण पश्चिम किनार्‍यावरील प्रदेशांतून हवा कमी थंड असते.
या देशाच्या भूपृष्ठाचें‘लारेन्सियन हायलंड,’ अपॅलेचेन हॉयलंड,’ नार्थ अमेरिकेच्या पर्वतांच्या ओळी व मध्यवर्ती मैदान असे भाग पडतात.
Image result for उत्तर अमेरिका खंड

अंटार्क्टिका


अंटार्क्टिका (रोमन लिपीAntarctica ;) हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागरम्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.
                   अंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक याने १७७२ मधे लावला. त्याच सुमारास ७ जानेवारी १८२० या दिनी प्रथमच बेलिग्ज हाऊजेन या दर्यावर्द्याने ५० किलोमीटर अंतरावरून बर्फाच्या डोंगरांची रांग पाहिली आणि त्याची विस्तृत माहिती जहाजाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली. म्हणून त्या दिवशी या खंडाचा शोध लागला असे मानले जाते. दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्रफळ १,३३,७७,००० चौ. किमी. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे. अंटार्क्टिकासभोवतीच्या महासागराला ‘अंटार्क्टिक महासागर’ किंवा ‘दक्षिण महासागर’ म्हणतात. परंतु तो खरोखर हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांचा दक्षिण भाग होय. 

अंटार्क्टिकाचे पृथ्वीवरील स्थान

ऑस्ट्रेलिया

              ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंडतास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो
साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने जगत होते. अठराव्या शतकात युरोपिय लोकांना या खंडाचा शोध लागला. आधी डचफ्रेंच व मग ब्रिटिश येथे आले. त्या आधीच चीनी लोकांना ऑस्ट्रेलिया खंड ज्ञात होता. आलेल्या युरोपीयनांनी येथिल आदिवासींना हुसकावून लावले व आपल्या वसाहती वसवल्या. ज्यांनी विरोध केला त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. पहिली वसाहत आताच्या सिडनी जवळ वसवण्यात आली. त्यानुसार सिडनी हे ऑस्ट्रेलियाचे आद्य शहर म्हणून ओळखले जाते.
               युरोपातील पुराण कथांमधून ऑस्ट्रालिस या खंडाचा (काल्पनिक) उल्लेख आढळतो. मॅथ्यु फ्लिंडर्स या दर्यावर्दी खलाशाने ऑस्ट्रेलिया खंडाला प्रदक्षिणा पुर्ण केली त्यावेळी त्याला वाटले की ऑस्ट्रालिस सापडले. म्हणून त्याने नकाशावर ऑस्ट्रेलिया अशी नोंद केली. व या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव मिळाले.
ऑस्ट्रेलियाचे स्थान

संदर्भ 
https://mr.wikipedia.org/wiki/आशिया
https://mr.wikipedia.org/wiki/ऑस्ट्रेलिया
https://hi.wikipedia.org/wiki/उत्तर_अमेरिका
https://hi.wikipedia.org/wiki/दक्षिण_अमेरिका
https://hi.wikipedia.org/wiki/यूरोप


No comments:

Post a Comment